पत्ता

Started by Sagar salvi, May 23, 2019, 12:05:03 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

हरवलेला पत्ता !

मी मलाच शोधत होतो
माझा पत्ता हरवला,
माझ्याच पायांनी तो वळण
दोनदा गिरवला.

मला सोडून मला कोणी
शोधू नये वाटले,
शोधणारे पत्ते आणि
डोळे सुद्धा फाटले.

रस्ते सुद्धा सांगतात
आजकाल चुकीचा पत्ता,
रस्त्यांवर आता साध्या
चिन्हांची आहे सत्ता.

वळणा वळणावरती
उजवी डावी चिन्हे असतात,
रस्ता चुकलो असल्याच
तिथेही चिन्हें नसतात.

बघा त्या रस्त्याच्या कडेला
कागदाचा तुकडा दिसेल,
पत्ता म्हणून उलटून बघा
तो ही तसाच कोरा असेल.