सुरुवात

Started by Sagar salvi, May 23, 2019, 08:40:31 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

हसरी सुरुवात !
सुरवात असते एका गोष्टीची
तर शेवट ही असतोच ना,
सुरवात पाहतो हसत आपण
शेवट रडत बघतोच ना.

आनंदाला बाहेर ठेऊन
साजरा ही तसाच करतो,
दुःखाला आत बंद करून
चेहरा हसरा दाखवतो.

एक क्षण असाही
आयुष्यात घडून जातो,
त्या क्षणाचा ढग
कधीही गडगडून जातो.

मग किती विजा किती पाऊस
पडत राहतो सतत,
आपण थेंब जमा करतो
तो क्षण राहतो बघत.

हसवणारे क्षण कुकरला लावून
वाफ छताला लागू दे,
बघत बघत त्या छताकडे
रात्र डोळ्यांना जागू दे.