मन

Started by Sagar salvi, May 23, 2019, 08:10:17 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

ओठ आणि मन !
तुझ्या ओठांवरून शब्दांना
अलगद बाजूला घ्यावे,
त्या शब्दांनी मला
तुझ्या मनातल सांगावे.

मला मिळावी माहिती
अर्धी त्या शब्दांकडून,
मनातल्या शब्दांना ओठांनी
चाळून पाठवावे.

मनाने द्यावी तंबी ओठांना
आमच्या मधे येऊ नको,
शब्द माझे प्रेम माझं
फायदा तु घेऊ नको.