खुणा

Started by Sagar salvi, May 24, 2019, 02:48:47 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

पावलांच्या खुणा !
तुझ्या पायांच्या खुणा
अर्ध्याच उमटल्या,
काही निघून गेल्या पुढे
बाकी मातीत चिमटल्या.

पूर्ण कश्या करू
या पायांच्या खुणा,
खुणा वाटत नविन आहेत
मोजण्याचा साचा जुना.

पावलं अशीच येऊन जातात
खुणा सुद्धा राहून जातात,
फरक पडतो खुणा नसल्याचा
ते मागे येऊन पाहून जातात.