खातं

Started by Sagar salvi, May 25, 2019, 06:21:23 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

मनाचं खातं !
मनाला एकदा वाटल खातं उघडावं बँकेत,
सरळ उठून सकाळीच लागलं बिचार रांगेत.

फॉर्म घेतला भरायला तर अटी खूप साऱ्या,
एक खातं उघडायला माराव्या लागतील फेऱ्या.

खात्यासाठी पैसे लागतात हे मनाच्या यादीत न्हवतं,
शेवटी होतं मनचं ते व्यवहार काय माहितीच न्हवतं.

पैसे नाहीयेत माझ्याकडे खातं चालू करण्यासाठी,
प्रेम भरपूर देऊ शकतो डिपॉजिट म्हणून भरण्यासाठी.

प्रेम बीम काही नको खात्यासाठी पैसे लागतात,
आमचं जग वेगळं असतं तिकडे सगळे प्रेमचं मागतात.

मनाच्या शाखा भरपूर आहेत त्यांचे व्यवहार त्यांनाच कळतात,
त्यांच्याच शाखेत प्रेमाचे नंतर सुद्धा रिटर्न मिळतात.