वेगळं

Started by Sagar salvi, May 25, 2019, 07:55:39 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

ते वेगळं फुल !
त्या फुलांच्या गाठोड्यात
एक वेगळं फुल असेल,
सगळ्यांना नसतील काटे
पण त्याला एक काटा असेल.

सुवासिक फुलांचा सुगंध
तुला गुंतवून ठेवेल तिकडे,
सगळ्यांना असेल सुगंध
पण ते एकच असेल फिके.

काही फुलं रंगाने
तर काही वासाने ओळखली जातात,
काही जातात वापरली
तर काही झाडावर सुकवली जातात.

नाहीये रंग नाहीये सुगंध
पण तो पठ्या मोडत नाही,
त्यांच्या सारखं दिसतो
पण स्वतःचा स्वभाव सोडत नाही.