खोली

Started by Sagar salvi, May 25, 2019, 11:33:27 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

बंद खोली !
तुझी आठवण येऊ नये
म्हणून स्वतःला कोंढून घेतलं,
मुर्खा सारखं तुझं नावं
ओठांवर गोंदून घेतलं.

खिडकी केली बंद
आणि भिंतीही काळ्या केल्या,
श्वासात तुझा कण नको
म्हणून हृदयाच्याही जाळ्या केल्या.

गपचूप दरवाजा उघडून
बघूया त्रास होतोय का,
असल्याचा भास नेहमी होतो
बघूया नसल्याचा भास होतोय का.