वेळ

Started by Sagar salvi, May 26, 2019, 06:40:09 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

वेळ गेलेली !
आलय इतकं डोळ्यात पाणी
की बोटी सोडता येतील का,
गेलेत काटे पुढे निघून
ते मागे घेता येतील का.

आता सुद्धा विचार पडतो
ती वेळ खरी होती का,
डोळ्यातला तो प्रत्येक थेंब
येतो माझ्या ओठी का.

लवकर आलेली वेळ
इतक्या लवकर जाते का,
आतातरी वेळ वेळेत येते
की तेवढाच उशिर लावते का.