सुखाचा शोध ???

Started by Ashok_rokade24, May 26, 2019, 09:44:11 AM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

जिवन अवघे वाया गेले ,
तरीही वाट पहात आहे,
कणा कणाने आयुष्य संपले,
अजूनही सुख शोधीत आहे ,

रात्र संपता संपत नाही,
दिवस चिंताग्रस्त आहे  ,
हुरहुर अनामिक ठेवून,
अस्ताला सूर्य जात आहे,

मायाजाल जरी सभोवती,
आपुलकीचा अभाव आहे ,
संवेदना न उरली काही,
माणूसकी हरवली आहे,

निवारा पाखरांचा संपला ,
वाडा ओसाड झाला आहे,
वाळवी नात्याला लागली,
मने सारी पोखरली आहे ,

मागोवा सुरांचा घेता घेता,
कर्ण बधिरता लाभली आहे,
ताळमेळ वाद्यांचा जमेना ,
संगीत हरवून गेले आहे ,

कोलाहल नीत सभोवती
घाव वर्मी होतच आहे ,
मुकबधीरता सदा जानवे ,
शोध सुखाचा घेतच आहे,

                         अशोक मु. रोकडे.
                           मुंबई.