दूर

Started by Sagar salvi, May 26, 2019, 05:33:52 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

नको जाऊ दूर !
आठवून बघ ते चांगले क्षण
रुसणं थोडंसं बाजूला ठेऊन,
आठव ते पहिलं ठिकाण
मग भेट मला तिथेच येऊन.

तुला चुकीचं बोलणार नाही
तु चुकीचं ठरवू नकोस,
चांगल्या क्षणात एकत्र असू
वाईट आठवणीत हरवू नकोस.

आठवतंय का तुला आपलं
हात धरून चालणं,
प्रत्येक चांगल्या क्षणाला
आपल्या हृदयाभोवती माळणं.

ती वेळ फक्त आपली
तो क्षण फक्त आपला असेल,
तु दोन पावलं पुढे ये
मी अर्धा रस्ता कापला असेल.

कळतात मला तुझ्या वेदना
त्रास मलाही होतोच आहे,
तु थोडंसं समजून घे
मी बदलायचं औषध घेतोच आहे.

तु पिकली असशील थोडीशी
मी ही थोडासा पीकलो असेन,
आवडणाऱ्या फुलांची ओंझळ घेऊन
तुझ्यासमोर गुडघ्यावर बसलो असेन.

तेंव्हा सुद्धा आता सारखीच
वरच्यावर रुसशील ना,
माझ्या समोर नाही पण
मागे वळून हसशील ना.

माझ्या थरथरणाऱ्या हातात
तुझा थरथरणारा हात असेल,
तुझ्या हातावरच्या रेषांची
माझ्या आयुष्य रेषेशी गाठ असेल.