गाव ...!

Started by prashantdevmore, May 27, 2019, 12:36:14 AM

Previous topic - Next topic

prashantdevmore

मित्रांनो नमस्कार!

आज पुन्हा एकदा लिहावेसे वाटले.
पण, कुठल्या मुद्यावर लिहावे, तेच कळेना. असाच विचार मनात सारखा तग धरुन बसला होता. तेवढ्यात मित्रांसोबत गप्पा मारताना मित्रांनीच विषय काढला. तो म्हणजे "आपलं गाव". तेव्हाच वाटले, गावच्या राहनिवरच लिहाव. नाही का?
विषय तर "लई झ्याक" आहे. आता म्हणाल, "लई झ्याक" हे काय?

हो, गावा बद्दल लिहायचे म्हणजे थोडी फार, गावची भाषा पण हविच ना! कदाचित, हें दोन शब्द वाचल्यावर, तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलेच असेल.

हा लेख लिहायचं कारण असे की, नोकरी साठी गावची बरीच लोकं शहरात राहतात. त्यातला मी एक. इथे राहताना मात्र क्षणा-क्षणाला गावंची आठवण ही येतेचं. गावात राहणार्यांना वाटते शहरात राहने म्हणजे खूपच मोठे. पण खरे सांगू, शहरात राहणे म्हणजे, स्वतः हरवून बसने. शहरात फक्त पैसा मिळतो. बाकी सर्व काही येतं, ते गावातूनच.

Read More...Click on below link...
https://devmoreprashant.blogspot.com/2018/08/blog-post.html