मन

Started by Sagar salvi, May 27, 2019, 06:50:17 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

मोकळं मन !
आता मोकळं झालंय मन
पुन्हा नको गुंतवू कुठे ,
रडशील पुन्हा सोडवताना
ते न कधी सुटता सुटे.

तुझ्या मनासारखं मन
बघ कोणाचं भेटतय का,
तुझ्या मनाची आग पाहून
तेही तसंच पेटतंय का.

तु मला त्रास देऊ शकतेस
मनाला देऊ शकणार नाहीस,
तु मला बाहेरून पाहू शकतेस
मनाला पाहू शकणार नाहीस.