तहान

Started by Sagar salvi, May 27, 2019, 09:43:27 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

तहानलेलं पान !
पान फांदीला विनवणी करतंय
बघ वाक एकदा खाली,
वरून पाणी सांडत नाहीये
त्या डबक्यात बुडतो आम्ही.

श्वास कोंडून मारण्यापेक्षा
बुडून मेलेलं चालेल,
माणुस पाणी देत नाही
डबकं नरड्यात पाणी घालेल.

एका पानाने शेवटी
फांदीचा हात सोडला,
अर्ध करपून जगण्यापेक्षा
डबक्याशी संबंध जोडला.

पिवळं पान डबक्यात पडलं
पण हिरवं काही झालं नाही,
डबक्यात पडून काळं झालं
पण काळं पाणी प्यायल नाही.