वाटसरू

Started by Sagar salvi, May 27, 2019, 10:41:14 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

वाटा आणि वाटसरू !

वाटेत भेटणारा प्रत्येक जण
आपला सोबती नसतो,
नाही गेलो त्याच्या बरोबर
तर आपण आपले उरु शकतो.

वाटसरू आहोत सगळे जण
प्रत्येकाला कुठेतरी पोहचायचं असतं ,
आपली वाट आपण निवडायची
प्रत्येक पायाला रोखायचं नसतं.

जबरीने जवळ घेतलेले पाय
मधल्या रस्त्यात सोडून जातात,
पाय गेले तर चालतील सुद्धा
पण आपल्या वाटा खोडून जातात.