आजारी

Started by Sagar salvi, May 28, 2019, 03:53:08 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

मन आजारी असल्याच !
फोन केला तिला
वाटलं डोळे रडणार नाहीत ,
बोलताना ओठ थरथरतील
पण शब्द धडपडणार नाहीत.

बोलायचं इकडचं तिकडचं
स्वतः बद्द्ल सांगायचं नाही,
द्यायचं तिला खूप सारं
पण स्वतःसाठी मागायचं नाही.

मधेच बोलणं थांबवू नकोस
संशय मनात घर करेल,
बोलणं चालू असतानाच
शांततेचा सूर उरेल.

तु स्वागत कर हसून
तिचे प्रश्न समोरून येतील,
तु बोलणं थांबवू नकोस
नाहीतर हुंदके उत्तरं देतील.

मन आजारी असल्याच
तिला कळू देऊ नको,
बांधून ठेव मनाला आत
तिकडे पळू देऊ नको.