चकमक

Started by Sagar salvi, May 28, 2019, 10:30:59 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

चकमक !

एकमेकांकडे पाठ करून
रुसून बसलोय दोघेजण,
टेबल खुर्ची शांत असतात
तसेच आहोत आपण पण.

राग आलाय मला
मी आज काय जेवणार नाही,
घे तुझ्या आठवणी परत
मी माझ्याकडे ठेवणार नाही.

मला लाईट चालू हवी
तिला लाईट बंद,
बोटांच्या या करामतीत
लाईटीने केला बंड.

रात्र होती चकमकीत
काळोख ही शांत होता,
आपला आपला म्हणताना
वेग वेगळा प्रांत होता.