धागे

Started by Sagar salvi, May 28, 2019, 11:44:42 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

तुटले नसते धागे !

पेरलं तुझ्या आठवणींना
चालता चालता मागे,
मी पुढे जात राहिलो
मागे तुटत होते धागे.

झोपलो तुझ्या आठवणीत
पण स्वप्नं आपले जागे,
मी पुढे जात राहिलो
मागे तुटत होते धागे.

मीच फक्त झालो मोठा
आठवण लहानासारखी वागे,
मी पुढे जात राहिलो
मागे तुटत होते धागे.

एक टोक होत तुझ्या हाती
का दिले नाही हिसकावे,
मी थांबलो असतो थोडा
तुटले नसते बघ धागे.