भाव जळाचा

Started by शिवाजी सांगळे, May 29, 2019, 07:38:06 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भाव जळाचा

वाहत्या जळासम एकरुप व्हावे
खळाळणे त्याचे मनात रूजवावे

राग लोभ द्वेष सारे ते आतले
होत अलिप्त कडेस सोडून द्यावे

येवो पुढ्यात कोणी कधी कसा
तृष्णा तृषार्ताची शमवित जावे

भाव जळाचा अलिप्ततेचा ठेवा
अनुसरण करण्या प्रयत्ने रहावे

नाते मनाचे सृष्टीची कथा अखंड
मैत्र त्यांचे शिवाशी बंधानी उरावे

© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९