भेट

Started by Sagar salvi, May 29, 2019, 09:02:24 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

भेट तुझी !

तुझी माझी भेट ही
अशी पावसाळी,
चिंब चिंब भिजलेल्या
सोनेरी उन्हाळी.

माझ्या ओठांवरती
तुझे शब्द यावे,
माझ्या मनातल्या शब्दांना
तु डोळ्यात पाहावे.

तो थेंब तुझ्या गालावर
असा सरकावा,
माझ्या ओठांनी त्याला
अलगद झेलावा.

थेंबा थेंबात दिसते मला
प्रतिबिंब तुझे,
तुझे डोळे लुकलुकणारे
थेंबांचे आरसे.

तुझी माझी भेट पुन्हा
घडावी आपसूक,
मनालाही भेटीची
लागे रुख रुख.