मोजमाप

Started by Sagar salvi, May 29, 2019, 08:24:28 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

मोजमाप !

आठवणीतल्या ओळीतले
शब्दही तुझे,
शब्द शब्द मोजताना
आठवण रुजे.

सोडलेला श्वास सुद्धा
परतावा वाटे ,
श्वास श्वास मोजताना
रुतलेले काटे.

कोरलेले नाव तुझे
हृदयात वाजे,
नाव नाव मोजताना
हृदय ही नाचे.

अंधारात सावली तुझी
पकडते हात,
सावली सावली मोजताना
अंधाराची वात.