ठसे

Started by Sagar salvi, May 30, 2019, 02:05:00 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

ठसे पावलांचे !
तक्रार असायची तुझी
मी पुढे पुढे चालतो,
मी पाय फक्त न्हेतो पुढे
ठसे तुझ्यासाठी माळतो.

माझ्याकडे येताना
तु ठस्यांचा आधार घे, 
स्पर्श कर तुझ्या पायांनी
आणि त्यांना आकार दे.

पुसलेल्या एका ठस्याला
तुझ्या पायाने जागं कर,
पुढे असलेल्या ठस्यांना
तु तुझ्या ठस्यांनी मागं कर.

साठूदे पाणी त्यात
ठस्यांचे तळे होऊ दे,
तक्रारींना त्या तळ्यात
वाटेल तेवढं पोहू दे.