तिचं माझं प्रेम

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, May 30, 2019, 10:23:06 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तिचं माझं प्रेम*

एक दिवस असंच झालं
ती समोर आली अन सारं
काही हवेत विरून गेलं
तनामनाने दांडगा गडी मी
पण तिचं बोलनं काळीज चिरून गेलं

तिला मी अंतरंगातून ओळखलं होतं
जेव्हा येत व्हत्या पावसाच्या सरीवर सरी
ती पावसात चिंब भिजलेली
तिला पाहून नजर माझी खिळलेली
कळतं नव्हतं काय करावं काय नाही
कारण तिच्या हातातला चहाचा कप
अन तिच्या हाताचा होणार थर काप
माझ्यावरच्या प्रेमाची चाहूल द्यायचा
पण कळत नव्हतं तिचा माझ्याबद्दलचा
गैरसमज कसा दूर करायचा

काळीज धडधडू लागायचं
तिच्यासाठी वेडबीड होऊ लागायचं
त्याला कळून चुकायचं सारं काही
ते ही प्रेम झाल्याचं सांगू लागायचं

तिच्या गालावरची खळी
हसताना ओठांची झालेली मोहक रचना
तिचं हसू आणखीन खुलवत होतं
तिची नजर भिरभिरायची
ती मात्र काहीच बोलत नसायची
एकमेकांत गुंतन तिला मान्य नव्हतं
पण प्रेम मात्र तिनं ही केलं व्हतं

तिला भेटायला जायचो
तिच्या गावी कधी कधी
भेट होईल म्हणून तिथंच
मुक्काम करायचो कधी कधी
पण तिचं साफ नाकारणं
मनाला ओझं व्हायचं
तिचं माझ्यावरचं प्रेम असून देखील
तिचं भेटायला न येण्याचं
कारण मात्र वेगळंच असायचं

तिचं अस वागणं मला
कधीच कळलं नाही
कारण तिच्या मनातलं
गणित मला काय जुळलं नाही
तेव्हा परत काळीज चिमटा घेतं
ती येणार याचं काहूर मनात उठतं
वाट पाहतो मग मी पुन्हा पावसाची
ती पुन्हा पावसात चिंब भिजून येईल
अन पुन्हा तिची माझी भेट होईल

याचंच आपसूक सुख मनात असायचं
म्हणून मन एक कोपऱ्यात घेऊन जायचं

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर