वाद

Started by Sagar salvi, May 30, 2019, 03:22:58 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

वाद !

तुला ही मान्य आहे
आपल्या दोघातला वाद,
एकाने शांत व्हावं
नाहीतर होऊ दोघे बाद.

तुझा माझा शेवट
वाद नाही ठरवणार,
जागं झालं प्रेम
तेच वादाला हरवणार.

वाद म्हणजे ऋतू
येत जात राहतात,
वादानंतरच्या प्रेमाची
दोघेही वाट पाहतात.