म्हातारं

Started by Sagar salvi, May 31, 2019, 11:34:29 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

म्हातारं पान  !

थकलेल्या त्या झाडाने
वाकून पाहील स्वतःत,
तो जिवंत असल्याचे
भास त्याला होतात.

एक पान म्हातारं
तर एक पान तरुण ,
गळणाऱ्या त्या म्हाताऱ्याला
फ़ांदया बघतात वरून.

फांदी ही हळहळते
तळमळते ते खोड,
पांढरे अश्रू गळतात तेंव्हा
होते जीवाची फोड.