परत

Started by Sagar salvi, June 01, 2019, 10:45:03 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

परत एकदा !
तु एकदा प्रयत्न केला असतास
मला समजून घेण्याचा,
तुला अर्थ कळला असता
माझ्या परत येण्याचा.

आलो तुझ्या जवळ
आणि पुसल्या येणाऱ्या वाटा ,
वाटांचाही हरवावा रस्ता
त्यांना परत न यावे जाता.

समोरासमोर असून ही
ओठांवर मुक्यांचे तोरण,
न बोलण्याला ही असावे
शब्दांचे कारण.