झाड

Started by Sagar salvi, June 01, 2019, 07:21:36 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

एक झाड !

माझ्या सावलीत जोडप्याला
मी एक होताना पाहिलंय,
हसू साठवलंय पानात
अश्रू मुळात झिरपत राहिलंय.

लहान मुलं आजोबा म्हणून
फांद्यांवर खेळलेत,
त्या थेंबांचे डाग अजून
खोडांवरच राहिलेत.

दररोज संध्याकाळी मात्र
श्वास माझा गुदमरतो,
त्या द्रव्याने आणि धुराने
मी मुळापासून घुसमटतो.

माझी मैत्रिण हवा
माझ्या परिस्थितीवर हसते,
सकाळी माझ्या पायापाशी
काचेची रांगोळी असते.