अनोळखी

Started by Sagar salvi, June 02, 2019, 08:18:43 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

अनोळखी भेट !

उगाच तु केलस तेंव्हा
पाहून न पाहिल्या सारखं,
झालो नजरे आड जेंव्हा
राहून न राहिल्या सारखं.

गपचूप गपचूप भिंती मागून
तु मला पाहत होतीस,
मी पाहू लागलो की अचानक
लपून राहत होतीस.

यायचीस मधेच चालत आणि
जाताना पळत जायचीस,
चेहरा ठेवून समोर मात्र
तिरक्या कोपऱ्यातून पाहायचीस.

तीन दिवस असेच गेले
लपाछुपी खेळण्यात,
ती पुढे कधी मी पुढे
कधी चालण्यात कधी पळण्यात.

झाली निघायची वेळ
आता भेटणे होणार नाही,
रडू कोसळेल मला
मी वळून पाहणार नाही.

उगाच काहीतरी विसरल्याचं
कारण काढून आलो वर,
खिडकीत उभी बघत होती
आली होती डोळ्यात सर.

हलक्या नजरेने मागून पाहील
पुढे जाण जमलंचं नाही,
त्या नंतर कधी माझं
खिडकीत मन रमलंचं नाही.