प्रतिबिंब

Started by Sagar salvi, June 02, 2019, 02:27:11 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

पानांचं प्रतिबिंब !
कुठून कसले पाणी
पानांवर येऊन राहिले,
पानानेही स्वतःचे
प्रतिबिंब त्यात पाहिले. 

पान हसलं खुशीत
सुंदर दिसतो म्हणून,
विसरलं भान सारं
हसलं देठवर करून.

गळाला थेंब खाली
पानाचं बघणं थांबलं,
झेललं दुसऱ्या पानाने
थेंबाचं आयुष्य वाढलं.

Atul Kaviraje

Re: प्रतिबिंब

श्री सागर साळवी सर,

     गहन विचार , आणि त्यातून मिळालेले सार्थ सार, हे आपल्या प्रतिबिंब या कवितेतून मला जाणवले.
एकापाठोपाठ एका पर्णा - नंतर दुसऱ्या पानाने झेललेला हा एक दंव - बिंदू, हा कितीही झाले तरी विरत नाही. पान बदलले पण थेम्ब तोच राहिला. त्या पानांना तो ओलावा , आपलेपणा देत राहिला.

     एक सुंदर कवी-कल्पना, जोवर पानांची च ळत  संपत नाही, तोवर हे असच अविरत सुरु राहाणार.
या थेंबाचे आयुष्यही क्षणोक्षणी वाढत राहाणार. पण माझे असे मत आहे, कि हे  कि त वर   ? शेवटी त्या जल-बिंदुला ही केव्हातरी मातीत विरायचं आहे ! जीवनासारखं ते ही क्षण-भंगुर आहे.

     सळसळत्या पानांस देत जीवन
     जल- बिंदू त्यावर होता विराजित
     आपले रूप त्यात पाहून
     पर्णही झाले होते स्तिमित

     पण ठाऊक नव्हते त्यास
     हे प्रतिबिंब आहे क्षणिक
     ओघळणे आहे जलाचा गूण-धर्म
     मातीत आहे वीर णे आणिक

-----श्री अतुल एस परब
-----दिनांक-२३.०५.२०२१-रविवार .