ढग

Started by Sagar salvi, June 03, 2019, 08:21:57 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

ढग !
ढग होते गडगडाट होता
पण थेंब न्हवता खाली,
एका ढगाची दुसऱ्या ढगाशी
भांडणं वरती झाली.

वाऱ्याने प्रयत्न केला
ढगांना लांब करायचा,
ढगांच्या इतक्या गर्दीत
वारा बिचारा थकायचा.

पाणी असुदे की नसूदे
ढग तरीही भांडतात ,
आपलं ओलसर मत ते
आभाळासमोर मांडतात.

आभाळ आता रागावलं
आणि झालं लाल लाल,
अशेच आहेत आभाळाचे
हे दरवर्षीचे हाल.

ढगही आता फसवतात
पाणी दाखवून पापणीला,
येतात फक्त तुझ्याचसाठी
कारण कामं मिळावं लेखणीला.