वाळू

Started by Sagar salvi, June 04, 2019, 07:35:10 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

वाळू आणि लाट !
लाट उसळून आली काठावर
वाळू लागली लाटेच्या माथ्यावर.

खुद्कन लाजून लाट परतली
वाळू अलगद पुढे सरकली.

लाटेच्या पायावर वाळूचे चटके
लाटाही देतात वाळूला फटके.

खूप वेळ लाट आलीच नाही
वाळू थबकून वाटच पाही.

सांजेला हवाही वाळूला तुडवी
शांत लाट कारंजे उडवी.

चांदणे वरतून पाही प्रतिबिंब
वाळूही चमके पाहून थेंब थेंब.