वाट

Started by Sagar salvi, June 04, 2019, 07:08:30 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

ती वाट !

ती वाट अजून तशीच आहे
कोरडी पण वाहणारी,
पुढे पुढे पाहताना
मागे सरकत राहणारी.

दाखवलं तिने मला
घडलेलं न घडलेलं,
व्यक्त होताना सांगितलं
दडलेलं, उघड पडलेलं.

उडलेले ते थेंबही सुकले
ओळखता येत नाही रंग,
दगड ही थबकून पाहत होता
अजूनही तो तसाच दंग.

त्या पानांनी पाहिलेलं सारं
बुटक्या पानांना सांगितलं,
जुन्या पानांबरोबर त्यांनी
मरण झाडांकडे मागितलं.

ती घटना काळी होती
रात्र अजून सावरते,
रात्र असो वा पहाट असो
ती वाट अजून घाबरते.