खोटं वागून माझ्याशी

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 05, 2019, 11:33:25 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.खोटं वागून माझ्याशी*

तुझ्यासारख वागणं
जरा जमलं असतं
तर खरंच सांगू सखे
हृदय कधी हरलं नसतं

खोटं वागून माझ्याशी
प्रेमाला वेगळ तू वळण दिलं
थोडं सुख होतं नशिबात माझ्या
ते ही सखे तू हिरावून नेलं

सारं काही संपून आता
मरण माझ्या सोबतीला आलं
दिलेलं फुलं होतं जगण्याची आशा
ते ही जाताना तू सोबत नेलं

आत्मा चिर निद्रेत गेलाय
आता सांत्वन मात्र करू नको
राख जळून खाक झाली
आता आठवण मात्र धरू नको

जर आली आठवण तुला
मी गेल्याच सुतकं पाळू नको
सरळ येऊन तू स्मशानात
थडग्यावर खोटे अश्रू ढाळू नको

राख तशीच जपून आहे थडग्यावर
ती तुझ्या अश्रूंत विरघळणार नाही
कारण सरण जळत असतांना
तुझं माझं उरलंच नव्हतं काही

✍🏻(कवी. अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर