वेड चहाचे

Started by शिवाजी सांगळे, June 06, 2019, 11:08:11 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वेड चहाचे

तव रूप कपाते साजरे दिसे
जागते तल्लफ पाहता मनी
सकाळी सकाळी ध्यास असे
हा वेड चहाचे लावी पिसे !

कषाय पेय म्हणतो कुणी
तजेला अर्क म्हणेल कुणी
आळस त्वरी जो पळवितसे
हा वेड चहाचे लावी पिसे !

प्रत्येका गोडी अतूट याची
नाते आगळे संपर्काते असे
वेळी अवेळी चवदार भासे
हा वेड चहाचे लावी पिसे !

धुंद दरवळ येताच तो जरा
पाऊले वळती त्याच्या कडे
घोटाप्रती कैफ चढता चढे
हा वेड चहाचे लावी पिसे !

© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९