पान

Started by Sagar salvi, June 06, 2019, 12:47:17 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

एक पान !
गर्दीत या रानात
आत्ताच उघडलेल्या पानात,
काय आले त्याच्या मनात
मिटले डोळे क्षणात.

बिटुकलं छोटं इवलं पान
पाहील वरती करून मान,
एकच हिरवं होत गान
बाकी सुकल सारं रान.

दचकून पाहील इकडे तिकडे
धूसर हवेत मी एकटच पान,
पिवळा डोंगर सुकल्या वाटा
वरून येणारे उष्ण बाण.

तहान लागली पाणी हवय
मी पण असाच सुकून जाईन,
तहानलेल्या रानात मी पण
त्यांच्यासारखाच वाकून राहीन.