ऐक तू

Started by D Ganesh, June 07, 2019, 12:50:15 PM

Previous topic - Next topic

D Ganesh


खामोशी काही गुणगुणते आहे
हा मौसम काही इशारे करतो आहे
वेड लागलंय माझ्या स्पंदनांना
ऐक तू, हृदय पण काही सांगतो आहे...

गेलेल्या क्षणाच्या घटिका येऊन थांबले
गोड शब्द तुझे ते आठवतात
पापण्याच्या सावलीत रुप तुझे भरले
तुझ्या डोळ्यातून, माझे डोळे दुर नाही जातात...
काय करावे मी; कसली ही विवशता आहे,
वेड लागलंय माझ्या स्पंदनांना
ऐक तू, हृदय पण काही सांगतो आहे...

नकळत, तुझे दु:ख चोरुन
तुला सर्व खुशी देईन
माझी हर व्याकुळता थांबवून
माझे स्नेह अर्पण करीन...
थरथरणार्या ओठावर; आलेली ही प्रार्थना आहे,
वेड लागलंय माझ्या स्पंदनांना
ऐक तू, हृदय पण काही सांगतो आहे...