वेदनेच्या सुया

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 09, 2019, 12:08:53 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.वेदनेच्या सुया*

तुझ्या वेदनेच्या सुया
आज टोचल्या जरी
काळीज झुरतांना
आल्या आपल्यात दरी

मी होतो किनारा तुझा
तू होती माझी लाट वेडी
कसं सांगू तुझ्याविना
आता जगण्याला नाही गोडी

चांदरात आज आली
जणू माझ्या सोबतीला
बोलला काजवा वेडा
बस आमच्या पंगतीला

वाट विरान झाल्यावर
मनी सूर जुळले भारी
गाव गेला पळून सारा
कळून चुकली दुनियादारी

फांदी कमकुवत झाली
जात माझी तिथे टांगून
सोडली दुनियेने माणुसकी
भिरभिर वारा गेला सांगून

तूच एक आशा होतीस
माझ्या जगण्याची शेवटी
तू ही दगा फटका दिलास
आता सोबत काळरात्र एकटी

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर