सांज

Started by Sagar salvi, June 10, 2019, 08:17:53 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

माझी मिठी पुरेल का
या सांजेला थांबवण्यासाठी,
काटे परवानगी देत नाहीत
ही वेळ लांबवण्यासाठी.

बोलणं अर्धच झालंय
कपही अजून भरलेला आहे,
मी ऊन घेतलं डोळ्यात साठवून
तिने वारा धरलेला आहे.

अंधार पसरला चोहीकडे
ऊन सुद्धा माघारी गेलं,
साठवलेल्या चार डोळ्यांनी
सांजेलाही लाजरं केलं.