कुशीत

Started by Sagar salvi, June 10, 2019, 12:03:02 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

तुझ्या पदराचं टोक धरुनी
शेपटी सारखं डुलत रहावे.

तु चालावे वाऱ्याच्या गतीने
मी पतंगासारखे उडून पहावे.

मुद्दाम तु थबकावे जागी
मी धडकून पायाला बिलगावे.

डोळ्यातला थेंब पडण्याआधीच
तु डोळ्यांना मिठीत घ्यावे.

दमलेल्या माझ्या पेंगत्या जिवाने
सावलीसोबत कुशीत शिरावे.