निशाण

Started by Sagar salvi, June 11, 2019, 07:31:15 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

रागात येऊन तु
वाट हिसकावून नेलीस ,
मला शोधताना तुला
त्या वाटेवर पाहिले.

वाट सोडून गेलो
निशाण फक्त ठेऊन,
निशाण पुसताना तुझे
थेंब तिथे वाहिले.

तु केलीस विनवणी
परत ये म्हणून
आलो मी रिकामा
निशाण अनोळखी राहिले.