सहवास

Started by SushantSPatil, June 12, 2019, 12:08:36 AM

Previous topic - Next topic

SushantSPatil

       सहवास.....

तिजसवे क्षण घालवता
मन माझे हे उमलले|
आनंदाने अन हर्षाने
काठोकाठ ते भरले||

दोन दिसाचे ते क्षण
भरभरून मी जगले|
भावनांचे ते भांडे
आज तृप्त जाहले||

नैराश्य, अधोगती सर्व
अलगद गळून पडले|
दोन दिसांचे ते क्षण संपता
दुःख पुन्हा जाहले||

आता या मनास वाटते
ते क्षण का देवा दाविले
आठवण येताच पुन्हा
दुःख क्षणात डोकावले!!!

- सुशांत पाटील
@SushsntSPatil