बहाणे लाख

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 12, 2019, 06:56:46 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.बहाणे लाख*

केसांचा अंबाडा
गजरा चोरून नेतो
काळजाचा कोपरा
पुन्हा मोहरून येतो

सोसाट्याचा वारा
सैरा वैरा पळतो
बघ तेव्हाच राणी
घाव आतला जळतो

लिपली भिंत आता
आपल्या दुराव्याची
काय गरज पडली
प्रेमाच्या पुराव्याची

आग कशी शांत करू
पुन्हा पाऊस आल्यावर
दुःख झाकून सारे गेले
पावसात चिंब न्हाल्यावर

तू बहाणे लाख केले
जवळीक न होण्याचे
काळजाच्या तुकड्यात
तू कधीच न येण्याचे

राहूदे बाजूला सारं काही
सरण पेट घेणार नाही
खोटी आसवे तुझी गं
प्रेमाची ग्वाही देणार नाही

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Satishtaral

वाचाव्यात तू माझ्या कविता
त्यातून कळाव्यात माझ्या भावना...
अंतरीचा दाह शमवू कसा गं,
समोर येऊन तूच जरा सांगना...

पाहावे वाटते खूप तुला पण
तुझी एकही झलक मला मिळेना...
का गुंतलो तुझ्यात मी एवढा,
माझेच मला कसं काही कळेना....

तुझी सवय एवढी झाली मला
तुझ्याविना मला आता जगवेना...
का अशी छळतेस मला तू,
का माझी खुळी प्रीत तुला उमगेना...

ये आता खूप झाले लपंडाव
खूप शोधले, तू मला सापडेना...
तुझ्या मिठीत मरायचे म्हणून
जीवाला हि हा देह सोडवेना...
कविराज सतिष तराळ