कोरले

Started by Sagar salvi, June 12, 2019, 05:34:32 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

तुझ्या डोळ्यातले कोरीव काम
मी हळूच चोरून पाहिले,
त्या कोरलेल्या नक्षीत
माझे डोळे कोरून राहिले.

तु पाहिले मला
न मी तुला पाहिले,
कोरलेले डोळे होते
जे आपले न राहिले.

तुझे डोळे माझे डोळे
एकरूप जाहले,
नक्षी तशीच कोरलेली
डोळे फक्त वाहले.