पापणी

Started by Sagar salvi, June 13, 2019, 02:42:33 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

आठवण काढून काढून
डोळे सुद्धा सुकले,
कधी होते ते बरोबर
ठोके आता चुकले.

थेंबा तु सुद्धा बोलना
तुला काय वाटते,
येणार नसशील तु पुन्हा
मी पापण्या ही कापते.

तुझ्या येण्याची वाट मी
आता पुसून टाकली,
तु न येण्याचे निमित्त झाले
मी पापणी ती झाकली.