गझल

Started by शिवाजी सांगळे, June 14, 2019, 01:03:43 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

---गझल---

शिंपून का जरी तो थोडाच खास गेला
देवून काळ काही तीचाच भास गेला !

सांडून थेंब थोडे ढग तो पसार झाला
या तापल्या धरेला लावून आस गेला !

पानास लागला त्या रानात घोर मोठा
राडा चिखल भुईचा दावून त्रास गेला !

घेता रजा जराशी मागील सालभर तू
शेतात राबणारा लावून फास गेला !

गावात बातमी ही वाऱ्यासमान सुटली
त्रासून नापिकीला सोडून श्वास गेला !

सत्यास अंत नाही म्हणुनी खुशाल देतो
त्याचीच शेवटाला त्यागून कास गेला !

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

nareshKwankhade


शिवाजी सांगळे

मनापासून धन्यवाद मित्र
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

nareshKwankhade

 अत्यंत सुंदर गझल लिहिली बंधु आपण.यामधील ह्या ओळी सर्वोत्तम आवडल्या.(संपुर्ण गझलच अप्रतिम आहे.)
"घेता रजा जराशी मागील सालभर तू
शेतात राबणारा लावून फास गेला !

गावात बातमी ही वाऱ्यासमान सुटली
त्रासून नापिकीला सोडून श्वास गेला !

शिवाजी सांगळे

आपला अभिप्राय मोलाचा आहे, असाच लोभ असू द्या, आपणांस मनापासून पासून धन्यवाद नरेशजी...
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९