फोन

Started by Sagar salvi, June 15, 2019, 07:49:22 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

काल एका अनोळखी नंबर वरून कॉल आला, आवाज तिचा होता.
तीने पहिला प्रश्न विचारला
तु कसा आहेस? 
आणि मागच्या दहा महिन्यांपासून ज्या डोळ्यांनी कोणालाच काही सांगितलं न्हवतं, त्यांनी उत्तरं द्यायला सुरवात केली.

काहीच उत्तर न देता मी फोन ठेऊन दिला,
मनाला वाटत होतं तीने फोन परत करावा, आणि मला वाटत होतं,
पुन्हा कानाला जर तिचा आवाज ऐकू आला तर हृदयातुन आवाज येणं बंद होईल.
आनंदाने कदाचित.

आजचा दुसरा दिवस परत अनोळखी नंबर वरून फोन आला,  मी नाही उचला, नाही जमलं मनाला, बोटांना सांगणं की फोन उचल म्हणून.
आज एक आठवडा झाला मला दररोज त्याचं वेळी, त्याचं नंबर वरून कॉल येतो मी नाही उचलत.

आज खूप दिवस झाले दररोज फोन येतो, पण मनाची तयारी अजून झाली नाही, फोन उचलून हूं म्हणायची.

Rajiv p

कळलच नाहि

Rajiv p