पहिला पाऊस

Started by Minakshi Pawar, June 16, 2019, 06:30:13 PM

Previous topic - Next topic

Minakshi Pawar

                     पहिला पाऊस

आज अचानक पाऊस आला
परत तुझी आठवण करून गेला
वार्याची हळूवार झुळुक घेऊन
आठवण तुझ्या स्पर्शाची करून
अचानक पाऊस थांबला
तू नसल्याचे सांगायला
वादळ जोरात येऊ लागले
सांगू लागले सार उद्ध्वस्त जीवनाचे
सोबत एक सोनेरी किरण घेऊ
सांगू लागले आजची पहाट नवीन आहे
हळूच थोडा पाऊस येऊन सांगू  लागला
मी तो नाही जेव्हा तू त्याचा हात हाती घेऊन चिंब भिजायचीस
मी तो आहे जेव्हा तू एकटीच आयुष्याशी लढत आहे स्वतःला सामर्थ्यशाली बनवत आहेस
पण मी तो नाही जो आयुष्याच्या वळणावर तुझी साथ सोडेलं
मी परत येईल .......... 
पाऊस पण तुझ्याच सारखा आहे रे
येण्याचे आश्वासन देऊन गेला
आणि मला प्रतिक्षेत ठेवून गेला
कदाचित कायमचा तुझ्याच सारखा..............

Ms.Anjali Pawar
pawaranjali416@gmail.com