भेट

Started by Sagar salvi, June 17, 2019, 08:08:00 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

कधी होईल परत भेट
हा प्रश्न तिला ही होता,
उत्तरासाठी मोकळा कॉलम
त्या खाली दिलाही होता.

मी काट मारली प्रश्नावर
तिनेही प्रश्न खोडला,
पुढच्या प्रश्नाकडे जाता जाता
सुटकेचा श्वास सोडला.

पुढे पुन्हा तेच प्रश्न
ज्यांची कधी उत्तरं न्हवती,
निबंधासारखं प्रेम होत
गणितासारखी सूत्र न्हवती.