आज मी पुन्हा नापास झालो

Started by siddheshwar vilas patankar, June 18, 2019, 06:56:45 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

आज मी पुन्हा नापास झालो

पुढल्या वेळेस नक्की पास होईन

हीच अशा मनी बाळगून

पुन्हा जोमात तयारीला लागलो

मम्मी पप्पा दोघेही घरी

चिंतातुर असतील

मला वाईट वाटू नये

म्हणून हळूच रडत असतील

मी ठरवलंय मनाशी घट्ट

हार मानायची नाही

देत जायचं असेच पेपरवर पेपर

जोपर्यंत नीट कळत नाही

कधीतरी उगवेल सूर्य माझाही

कधीतरी असें मीही कुणाचा तरी बाप

पण सालं माझं पोर माझ्यावाणीच निघालं

तर होईल नको तो ताप

कितीही झालं तरी मी माझी विकेट फेकणार नाही

बापाने एवढा पैसा लावलाय माझ्यावर

फुक्कट घालवणार नाही

माहित आहे , मुद्दल वाढत चाललीय

पण एक दिवस , व्याजासकट देईन परतावा

त्याआधी मला या परीक्षेत पास तरी कर,, देवा

{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

[पेपरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाचून जीव घाबराघुबरा होतो . सालं हि कोवळी पोर अशी माना टाकायला लागली तर आईबापच काय होत असेल ते विचारच करायला नको .. त्यांनी अपयशाकडे दुर्लक्ष करावं हि नम्र विनंती ..]
सिद्धेश्वर विलास पाटणकर C