कळ्या

Started by Dnyaneshwar Musale, June 18, 2019, 11:06:48 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

कळ्या

कळ्या असतात
तशाच दिसतात,
लाजऱ्या गोजऱ्या,
जीव लावला तर
त्या जोर जोरात हसतात.

कधी त्यांना ही  बोलावं वाटतं
म्हणूनच
आज
कुजबुजत कुजबुजत
आज एक कळी बोलली

मी सुंदर उमलतेच अजुन
तोच,

नजरेत मी साऱ्यांच्या भिनते
श्वास सोडुन
मी माझ्याशीच शिणते.

कुणी येत ओरबाडून
जातं,
कुणी धाग्यात ओवून  घेत.


कोवळ्या पणात
झेपणार तरी कसं
धाग्याच ओझ भाळी,
तुडवली जाणार फक्त
म्हणुन सुंगधी कळी.

मला हवाच असतो
माझ्या मायेचा सहवास,
गुदमरला जातो
मनाच्या कुंपणात
श्वास,
घेऊन सारे आभास.

ओलाव्यातून तुम्ही
खुरटल्या साऱ्या या कळ्या,
समजावे तुम्हा
न होऊ द्यावा कळ्यांच्या
पाकळ्या.