WhatsApp, RIP आणि आपण

Started by Manoj Sakrikar, June 19, 2019, 11:19:15 PM

Previous topic - Next topic

Manoj Sakrikar

म्हणे WhatsApp आहे हाताशी,  पण किती यांत्रिक आणि आभासी

क्षणात येई RIP रडका,  अन पाचव्या मिनिटाला emoji हसरा

RIP करतो सांत्वन थेट,  कशाला हवी मग फोन किंवा भेट?

किती रे कोरडे तुम्ही RIP वाले,  ठाऊकही नसते नक्की कोण गेले

लक्षात ठेव एक दिवस गाठ पडेल यमाशी,  अनेक जण बाळगून असतील तेव्हा RIP हाताशी

अडणार नाही घास कुणाच्याच ओठी,  अहो त्यांच्या Messages ची यादी किती मोठी

RIP मुळे त्या मुक्ती तुला मिळणार नाही,  कारण लेका तुझा आत्माच तुझ्यात नाही

(कवी - मनोज साक्रीकर)